Satyajit Tambe’s Attack on Corruption in “Education Department”
आ. सत्यजित तांबे यांचा “शिक्षण विभागातील” भ्रष्टाचारावर हल्ला- अहमदनगर
आमदार सत्यजीत तांबे यांनी विधिमंडळात विविध विषयांवर ताशेरे ओढले. त्यात त्यांनी शिक्षण विभागाच्या
शिक्षक भरती घोटाळा, परीक्षामधील पेपरफुटीची प्रकरणे, निकालांमधील दिरंगाई अशा विविध समस्यांवर बोट ठेवले.
एकीकडे शिक्षणमंत्री चांगलं काम करत असले, तरी शिक्षण विभाग भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे, असा घणाघात करत राज्यात घडणाऱ्या भ्रष्टाचारांच्या अनेक प्रकरणांपैकी सर्वाधिक प्रकरणं शिक्षण विभागाशी संबंधित असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. तसेच शिक्षक, शिक्षण संस्था आणि विद्यार्थी, यांच्याशी संबंधित अनेक समस्या प्रलंबित असताना त्यावर या अर्थसंकल्पात काहीच तरतूद नसल्याची दुखद खंतही त्यांनी व्यक्त केली.
आमदार म्हणून निवडून आल्यापासून सत्यजीत तांबे यांनी शिक्षण विभागातील अनेक प्रश्नांना विधिमंडळासह अनेक व्यासपीठांवर योग्य पद्धतीने वाचा फोडली आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी त्यांनी भाषणादरम्यान शिक्षण विभागातील अनागोंदी कारभाराची पोलखोल केली.
शिक्षणसंस्थांना २०:४०:६० अशा ३ टप्प्यांत अनुदान देणे, थकीत वेतन बिलं देणे, अश्याप्रकारचे प्रश्न अद्यापही प्रलंबित असून या अर्थसंकल्पात त्यासाठी काहीही तरतूद केली नसल्याचं त्यांनी दाखवून दिल. “सत्यजीत तांबे” यांनी आपल्या भाषणादरम्यान राज्य सरकारने केलेल्या शिक्षक भरतीचं कौतुक केलं. पण याच धर्तीवर प्राध्यापकांची पदंही भरणं गरजेचं होतं अस सुद्धा प्रतिपादन केल. आज महाराष्ट्रातील अनेक कॉलेजेस मध्ये ११-१२ वी वर्गाच्या “कला” शाखा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मात्र सध्या तरी त्याबाबत राज्य सरकारकडे काहीच धोरण नाही असेच चित्र आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी या अर्थसंकल्पात काहीच तरतूद नाही हा मुद्दा त्यांनी पुन्हा पुन्हा मांडला. आपल्या भाषणादरम्यान आ. सत्यजीत तांबे यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यशैलीची तारीफ केली. शिक्षणमंत्री चांगलं काम करत आहेत. पण शिक्षण विभागाचा कारभार अत्यंत अनागोंदीचा झाला आहे.