https://www.chronicles360.com

MSAMB PUNE महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी सेवानिवृत्ती वेतन योजना 2024

MSAMB PUNE, महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी सेवानिवृत्ती वेतन योजना 2024

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे (अधिनस्त) 

उद्देश

बाजार समितीच्या कर्मचा-यांना सेवानिवृत्ती नंतर आर्थिक स्थैर्य देण्यासाठी कार्यान्वीत.

  • शासनाची दि. 29.09.1988 चे आदेशान्वये शासन व पणन मंडळ आर्थिक सहाय्य करणार नाही या अटीवर मान्यता.
  • प्रत्यक्ष योजना दि. 01.07.1991 पासून कार्यान्वीत.

अंमलबजावणी

  • दि. 29.09.1988 चे आदेशान्वये कृषि पणन मंडळावर पेन्शन योजना राबविण्याची जबाबदारी सोपविली.
  • तांत्रिक कारणास्तव दि. 01.07.1991 ते 31.03.2013 बाजार समिती संघामार्फत योजनेची अंमलबजावणी.
  • दि. 01.04.2013 पासून पुन्हा कृषि पणन मंडळाकडे हस्तांतरीत.

पणन मंडळाचे अंतर्गत पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी दोन समित्या.

  • मा. पणन मंत्री यांचे अध्यक्षतेखाली पणन मंडळाने नेमलेली उपसमिती.
  • या उपसमितीने नेमलेली कर्मचारी प्रतिनिधींची कार्यकारी समिती.

योजना हस्तांतरणानंतर घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय.

  • योजनेस आयकर मुक्त व ज्यादा व्याजदराने उत्पन्न मिळावे यासाठी सदर योजना स्वतंत्ररित्या न राबविता कृषि पणन मंडळांतर्गत राबविण्यात येते.
  • दि. 01 एप्रिल 2013 पासून बाजार समितीच्या सेवेतील कर्मचार्‍यांसाठी नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू.
  • दि. 01 एप्रिल 2018 पासून नवीन अंशदायी पेन्शन योजनेतर्गत सेवेतील कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष मिळालेले व्याजदरानुसार रक्कम जमा.
  • या पेन्शन योजनेतर्गत कर्मचार्‍याचे आकस्मिक निधन झालेस त्यांच्या वारसाला रू. 50,000/— अर्थसहाय्य.
  • दि. 01 ऑगस्ट 2014 पासून जुन्या पेन्शन योजनेच्या कर्मचार्‍यांना पेन्शनमध्ये 30% वाढ.
  • योजनेत सामिल सभासदांचे स्वतंत्र खाते तयार करून प्रत्येक वर्षअखेर त्यांच्या जमा रक्कमा संबंधित बाजार समित्यांना कळविल्या जातात.
  • सदर योजनेतर्गत मार्च 2018 अखेर रक्कम रू. 146.72 कोटी गुंतवणूक.

मार्च 2018 अखेर योजनेत सामिल बाजार समिती व कर्मचारी आढावा

अ.क्र तपशिल बाजार समिती कर्मचारी
सामिल बाजार समित्या १७७ २५२४
बाहेर पडलेल्या बाजार समित्या ७० ६९६
सामिल नसलेल्या बाजार समित्या ६०
३०७ ३२२०
जुने सेवानिवृत्त वेतनधारक ७३२
नवीन अंशदायी निवृत्ती वेतन धारक ८७
एकूण ८१९

 

पेन्शन फॉर्म कर्मचाऱ्याचा सेवा निवृत्ती वेतन प्रकरणाचा नमुना
नवीन कर्मचारी माहिती फॉर्म नवीन कर्मचार्यांसाठीचे संमतीपत्र
जुन्या स्कीम चा पेन्शन फॉर्म रिफंड रेग्युलर रिटायरमेंट कागदपत्रे
कर्मचाऱ्याचा रिटायरमेंट पूर्वीचा मृत्यू झाल्यास वारसाला लागणारी कागदपत्रे